लग्नाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांसाठी दिले बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर

मुंबई – अनेक कोरोना वॉरिअर्सनी जीवाची पर्वा न करता देवदूताप्रमाणे गरजवंतांना मदतीचा हात दिला. समाजातील सधन लोकांपैकी बरेचजण कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. पैसै, खाद्यपदार्थ, रेशन, कपडे रुग्णालयांना बेड पुरवणं जमेल तशी मदत केली जात आहे.
मुंबईतील वसईच्या एका जोडप्याने लग्नाचा खर्च टाळून कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. या जोडप्याने कोरोना रुग्णांसाठी ५० बेड दिले आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार २८ वर्षीय एरिक एंटोन लोबो आणि २७ वर्षीय मर्लिन यांनी वसईच्या नंदाखास गावात लग्न केले. साध्या पद्धतीने लग्न करून त्याच पैश्यात या जोडप्याने ५० बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान केले आहेत. सतपाला गावातील कोविड 19 सेंटरमध्ये बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर दान करण्यात आले आहेत.
पालघरमध्ये १५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा स्थितीत आपण काय करू शकतो. असा विचार मनात आल्यानंतर आम्हाला ही कल्पना सुचली. स्थानिक लोकांसाठी आम्हाला काहीतरी करायचे होते. म्हणून बेड दान करण्याचं आम्ही ठरवलं. या कामात आम्हाला स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी मदत केली., असे एंटोन लोबो यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here