जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव न पा तर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी,उपनगराध्यक्षा सौ कल्पना विलास महाजन,गटनेते पप्पू भावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.
धरणगाव येथील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर,नगरसेवक वासुदेव चौधरी,नगरसेविका सौ आराधना नंदकिशोर पाटील यांनी प्रत्येक घरी जाऊन आरोग्य पथकासह माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियांना संदर्भात मार्गदर्शन करून त्याची ऑक्सी मीटर द्वारे ऑक्सिजन लेव्हल,नागरिकांचे शरीराचे तापमान व त्यांची संपूर्ण आरोग्य माहिती तपासून त्यांना घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन हि केले.
या प्रसंगी मा.नगरसेवक प्रकाश पाटील,छोटू जाधव,रवींद्र जाधव, कमलेश बोरसे,नंदु पाटील,नगराज पाटील,गौरव देशमुख लांडगे गल्ली शाखा पदाधिकारी व आरोग्य विभागाचे निलेश वाणी,सुनील पाटील,धनराज वानखेडे,प्रज्ञा खंडेराव,भाग्यश्री मोरे आदी उपस्थित होते.








