माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी अलिबाग येथील लालबाग परिसरास भेट दिली तेथील सागर विजय पाटील या कुटूंबियांना भेटून तसेच परिसरातील गृहभेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांना या मोहिमेचे महत्त्व सांगून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ केला.
या प्रसंगी अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड.मानसी म्हात्रे, नगरसेविका वृषाली ठोसर, नगरसेवक अजय झुंजारराव, गौतम पाटील, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसिलदार सचिन शेजाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास घासे, मुख्याधिकारी महेश चौधरी, इतर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी म्हणाल्या की, “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी जबाबदारीने काम पार पाडावे. लोकांशी आपुलकीने बोलून त्यांना या मोहिमेचा उद्देश आणि उपयुक्तता समजावून सांगावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here