ठाणे (सहसंपादक एस.ए. बनसोडे) – विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे घटनांना आळा घालण्यासासठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे सुचनेप्रमाणे विक्रांत देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर विभाग तसेच भागवत सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विक्रमगड पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदाकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीत नामे १) दशरथ बाबल्या फडवले, वय १८ वर्षे, रा.देहर्जे नदीजवळील टेकडीवर, ता.विक्रमगड, जि.पालघर २) अजय संतोष फडबळे, वय २० वर्षे, रा.इंदगांव फनसपाडा, ता.विक्रमगड, जि.पालघर यांना दि.१७/०९/२०२० रोजी अटक केली आहे.
आरोपीत यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी विक्रमगड पोलीस ठाणे हद्दीतील रोसो व्हिला व्हिलेज, देहर्जे ता.विक्रमगड, येथील २ बंद बंगल्यांचे दरवाजे उचकटून घरात प्रवेश करुन बंगल्यामधील म्युझीक सिस्टीम, हॅवल्स कंपनीचा सिलींग फॅन, केरीओ कंपनीचे २ एल.ई.डी.टी.व्ही. व आयनॉक्स कंपनीचे म्युझीक सिस्टम असा एकुण ३४,०००/- रुपयाचा माल चोरुन नेला असल्याबाबत कबुल करुन चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करुन विक्रमगड पोलीस ठाणे अभिलेखावरील १)गुन्हा रजि.नं. 1 ९९/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८० माणे, दि.०४/०९/२०२० रोजी दाखल, २)गुन्हा रजि.नं. | १०१/२०२० भा.दं.वि.सं.कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दि.०९/०९/२०२० रोजी दाखल घरफोडीचे गुन्हे उघडीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ही यांचे पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, विक्रमगड पोलीस ठाणे याचे मार्गदर्शनाखाली विक्रमगड पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.







