ए.टी.एम सेंटरमध्ये मदत करण्याचे बहाण्याने कार्ड बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद

ठाणे (सहसंपादक एस.ए. बनसोडे) – विरार पोलीस ठाणे हददीत ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुकीचे गुन्हयांचे घटनांना आळा आलण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, यांचे सुचनेप्रमाणे विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती.रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदाराचे मदतीने आरोपीत १)रोहीत मृदुल कुमार पांडे वय २८ वर्षे रा- रूम नं ०३, यादव नगर, पंकज यादव चाळ, संतोषभुवन नालासोपारा पुर्व मुळ राह- बडरखुर्द गाव, पोस्ट- हरीया, जिल्हा बस्ती राज्य उत्तरप्रदेश २)प्रदयुम राधेश्याम यादव वय २१ वर्षे रा- रूमनं ०५, सिताराम हॉटेल, वलई पाडा, संतोषभुवन नालासोपारा पुर्व मुळ राह- जौनपुर, करीकत, परमानंदपुर, उत्तरप्रदेश यांना दिनांक १६/०९/२०२० रोजी १८.५६ वा. अटक करण्यात आली आहे.
आरोपीत यांनी ए.टी.एमचे सहाय्याने काही वस्तु खरेदी केल्या व रोख रक्कम काढुन घेतली आहे. त्याप्रमाणे आरोपीत यांचेकडुन १,५१,६००/- रू कि.चे टीव्ही, एसी, होमथिएटर, सोन्याची अंगठी, व कॅमेरा हे जप्त केले आहे व तसेच ८३,०००/- रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपीत यांचेकडून विरार व माणिकपुर पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आले आहे. सदर गुन्हे उघडकीस आणणेकामी सायबर सेल पालघर येथील पोउपनिरी/सिध्देश शिंदे व पोशि/दुर्गेष्ट, पोशि/गव्हाणे, पोशि/चव्हाण, पोशि/पाटील यांनी मदत केलेली आहे.
खालील प्रकरणातील मुद्देमाल आरोपीतांकडून मिळून आला आहे. विरार पोलीस ठाणे गु.र.नं. १)६५,०००/-रू कि.चा कॅनॉन कंपनिचा कॅमेरा जु.वा.कि.सु ७५१/२०२० भा.दं.वि.सं. | २)१९,४००/-रू कि.ची सोन्याची अंगठी जु.वा.कि.सु कलम ४२०, ३४, ३)२०,०००/-रू कि.चा टीसीएलकंपनीची ३२ इंच एलईडी टीव्ही ४)३६,०००/-रू कि.ची हायर कंपनीचा ए.सी. | जु.वा.कि.सु ५)११,२००/-रू किचे टू व्हिजन कंपनीचा होम २ विरार पोलीस ठाणे गु.र.नं. १०,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराचे २० नोटा 1 २१/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे विरार पोलीस ठाणे गु.र.नं. ८,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराचे १६ नोटा । ३७/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ प्रमाणे विरार पोलीस ठाणे गु.र.नं. १९,०००/- रोख रक्कम त्यात २००० रू दराचे ०९ नोटा व | । १४८/२०२० भा.दं.वि.सं. | ५०० रू दराचे ०२ नोटा कलम ४२० प्रमाणे विरार पोलीस ठाणे । १०,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराचे २० नोटा ५२७/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे विरार पोलीस ठाणे । १०,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराचे २० नोटा ७७९/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे विरार पोलीस ठाणे । १२,०००/- रोख रक्कम त्यात २००० रू दराचे ०६ नोटा ६३०/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे माणिकपुर पोलीस ठाणे । १४,०००/- रोख रक्कम त्यात ५०० रू दराचे २८ नोटा २९१/२०२० भा.दं.वि.सं. कलम ४२० प्रमाणे.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, सफौ/राजेश वाघ, पो.हवा./सचिन लोखंडे, पो.ना./सचिन घेरे, पो.ना./विजय दुबळा, पो.ना/हर्षद चव्हाण, पो.ना./भुषण वाघमारे, पो.शि./इंद्रनिल पाटील, पोशि/विशाल लोहार, पो.शि./सुमित जाधव, पो.शि/रवी वानखडे, पो.शि./ सुनिल पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here