जळगांव (संपादक सुनिल पाटील) – रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे अवार्ड वितरण कार्यक्रम झाला त्यात रोटरी स्टार्स क्लबला बेस्ट कम्यूनिटी एक्टिविटीज, नॉन मेडिकल एक्टिविटीज, बेस्ट Rcc एक्टिविटीज, बेस्ट फेलोशिप, आऊट स्टॅंडिंग वोकेशनल सर्विसेस अशा पाच प्रतिष्ठीत ॲवार्डस्नी गौरविण्यात आले.
बेस्ट प्रेसिडेंटएड्यूलजी ट्रॉफी डिस्ट्रिक्ट रो. सागर मूंदड़ा यांना मिळाली असून, त्यांनी सगळ्या क्लब सदस्यांच्या सोबतीने संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.डिस्ट्रिक्ट च्या 95 क्लब मधून उत्कृष्ट प्रेसिडेंट पुरस्कार पटकावण्यासह सागर मुंदडा यांच्या अध्यक्षतेत रोटरी स्टार्स क्लब ला 5 पुरस्कार मिळाले. यानिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.







