पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – दिनांक : 19 / 9 / 2020 रोजी बारामती विभागात पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना त्यांच्या विश्वासातील बातमीदारकडून बातमी मिळाली की देहूरोड पोलीस ठाणे कडील दाखल N D P S गुन्ह्यातील अटक आरोपी नितीन झेंडे यांचा भाऊ शुभम झेंडे याने त्याचा मित्र आनंद गजघाटे रा,पाटील वस्ती वालचंदनगर ता,इंदापूर जि, पुणे यांच्या घरामध्ये गांजा नावाचा अमली पदार्थाचा साठा ठेवलेला आहे,
ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी वालचंदनगर पोलीस ठाण्याचा स्टापसह जाऊन छापा टाकला त्यावेळी त्या ठिकाणी सुमारे दोन किलो वजनाचे खाकी रंगाचे 13 पुढे त्याची एकूण किंमत अंदाजे 3,10,000 रुपये असलेला गांजा जप्त केला असून पुढील कारवाई कामी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे,
सदरची कारवाई ही मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग याच्या आदेशाने पद्माकर घनवट वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स,पो,नि,दिलीप पवार वालचंदनगर पो,स,ई, अमोल गोरे स्था,गु,शाखा पो,हवा,ज्ञानेश्वर सिरसागर पो,ना,गुरू गायकवाड पो,ना,सुभाष राऊत पो,हवा,काशीनाथ राजपुरी सर्व नेमणूक स्था, गु,शा, पो,सई जगताप पो,हवा,सातव पो,वा,शिंदे पो,ही कळसाई म,पो,शि,जामदार वालचंदनगर पोलीस स्टेशनयांच्या पथकाने केलेली आहे,







