- वाहन करारासाठी नोंदणी
- दोन कोटींचे धनादेश वाटप
- मजुरांच्या कराराचा अंतिम मसुदा तयार
नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – दहा दिवसांपूर्वी कामगार संघटनेने यशस्वी करार केल्यानंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरु होण्यासाठी कामगार संघटना युध्द पातळीवर कामाला लागली असून, रविवारी (दि.२०) धाराशिव संचलित वसाका कारखान्याच्या उस तोडणी वाहतूक ठेकेदारांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले.
अवघ्या दहा दिवसांपूर्वीच यशस्वी करार झाल्यानंतर युध्दपातळीवर कामाला लागलेल्या कामगार संघटनेने कामगार उपायुक्त कार्यालयाकडून मान्यता मिळविली. करार होताच लगेचच १० सप्टेंबरपासून शेकडो कामगार कामावर रुजू होण्यास सुरुवात ?जाली.
सद्यस्थितीत ऊसतोड मजुरांच्या कराराचा अंतिम मसुदा तयार होत असून, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांमध्ये करार करून, साखळीपध्दतीने एकमेकांना जामीन राहत करार केले जात आहे. आजवर एकूण ९० ते ९५ वाहतूक ठेकेदारांना दोन कोटी रुपयांची उचल देण्यात आली आहे. यात एकूण २५५ ट्रक, ट्रॅक्टर, १२० मिनी ट्रॅक्टर, ७५ बैलगाड्यांची नोंद झाली आहे. लवकरच या वाहतूक ठेकेदारांना दुसराही हप्ता देण्यात येणार असल्याची माहिती धाराशिव उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील, आबासाहेब खारे यांनी दिली आहे.
शनिवारी ऊस तोडणी मजूर व वाहतूक ठेकेदारांना पहिला हप्ता वाटप करण्याप्रसंगी धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे , सुरेश सावंत , संतोष कांबळे ,संजय खंरात , संदीपान खारे सुहास शिंदे ,जनरल मॅनेजर हनुमंत राव पाटील , युनियन अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव,शेतकी अधिकारी सुधाकर सांळुखे उस विकास अधिकारी तुषार कापडनिस आदी मान्यवर उपस्थित होते.







