कामटवाडा शिवारातील साळुंके नगर परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त; पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

साळुंके नगर

नाशिक (जिल्हा क्राइम रिपोर्टर सतीश शेवाळे) | कामटवाडा शिवारातील साळुंके नगर परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत परिसरातील त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, अनेक वेळा सूचना देऊनही अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दैनंदिन गरजांसाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी बरीच भटकंती करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन साळुंके नगर परिसरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here