‘डान्सिंग क्वीन’च्या सेटवर अप्सरा दिसली सिंड्रेलाच्या रुपात

मुंबई (गणेश तळेकर) – मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हटलं तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीशिवाय दुसरं कोणतंच नाव डोळ्यासमोर येत नाही. आपल्या अभिनयासोबतच नृत्यानेसुध्दा सिनेरसिकांची मनं जिंकणारी सोनाली आज मराठी मनोरंजनविश्वातली आघाडीची अभिनेत्री आहे.
सोनाली पुन्हा एकदा डान्स रिएलिटी शो डान्सिंग क्वीनच्या नव्या पर्वाचं परिक्षण करणार आहे. परिक्षकपदी विराजमान झालेल्या सोनाली कुलकर्णीचं या शोच्या प्रोमो शूटच्या निमित्ताने मनमोहक असं सिंड्रेला रुप चाहत्यांसमोर आलं. या शोच्या प्रोमोशूट दरम्याने काही खास फोटो सोनालीने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. अप्सरेला ह्या सिंड्रेला ुपात पाहून चाहते घायाळ नाही झाले तरच नवल.सोशल मीडियावर सोनालीच्या या दिलखेचक फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केलाय. अभिनेता अद्वैत दादरकरच पुन्हा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here