मुंबई (गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी ‘हल्क’सारखा लूक अपेक्षित असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हल्कला जॉन अब्राहमचा फोटो लावण्यात आला होता.
त्यानंतर आता जॉन अब्राहमने चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं त्याची शरीरयष्टी पाहून चाहते फिदा झाले होते. आधीच्या चित्रपटाप्रमाणे सिक्वेलमध्येही देशभक्तीवर आधारित कथा असल्याचं पोस्टवरुन स्पष्ट दिसत आहे.
जॉन अब्राहमने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरवर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगणारा “जिस देश की मैय्या गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है” हा डायलॉग देण्यात आला आहे.
मिलाप झवेरी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी जॉनने हल्कचा पोस्टर शेअर करत मिलाप झवेरी यांना असणारी अपेक्षा सांगितली होती. जून महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जॉनने पोस्टर शेअर करताना चित्रपट पुढील वर्षी ईदला १२ मे २०२१ ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.







