दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – शिंदखेडा तालुक्यातील नवे आच्छी गावात ७०० वर्षा पूर्वीचे वडाचे झाड आहे व ते काही कारणास्तव कोरडे झाले असल्यामुळे आच्छी गावात दुसरे वडाचे झाडच नाही व वडाचे झाड हे हिन्दु धर्मात पुजनिय असल्याने या वडाच्या झाडाला वड पोर्णिमेच्या दिवशी महीला,माता, भगिनी वडपोर्णिमेच्या दिवशी उपवास करून पुजा करतात व आच्छी गावात वडाचे झाड नसल्यामुळे नवे आच्छी गावातील महिलांना बाहेर गावी किंवा गावापासून दूर असलेल्या कोरड्या वडाच्या झाडाची पुजा करावी लागत
सध्या वसंतऋतू असल्यामुळे आच्छी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष व रविंद्र मोहन यांनी कै.दंगल मोतीराम ईशी , कै.वामन भिला कोळी यांच्या स्मणार्थ व मराठी वर्षाचातील अधिक मासारंभ च्या पहिल्या सोमवार निमित्त आज दिनांक २१/०९/२०२० रोजी नवे आच्छी गावात वडाचे वृक्ष रोपण करण्याचे आयोजित केले.
वृक्षारोपण करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना आमंत्रित करून यांच्या हस्ते वृक्षारोपण केले त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी निसर्ग राजाला नमन करून विनवणी केली की या वडाच्या वृक्षा प्रमाणे या गावातील शेतकऱ्यांची प्रगती होवो सदा वडाच्या झाडासारखे शेतात हिरवळ टवटवीत पिक, पाणी राहो शेतकरी राजा सदा सर्वदा सुखी राहो असे नमन करून विनवणी केली त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे ,नवे आच्छी गावातील सुरेश कोळी, साहेबराव ईशी, सखाराम ईशी विजय ईशी, रोहित अहीरे सह गावकरी उपस्थित होते तरी या वृक्ष रोपणाचा कार्यक्रम साठी तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब ईशी व रविंद्र मोहन यांनी परिश्रम घेतले




