शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – टोकरे कोळी युवा मंच तर्फे भारताचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम दि.14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जात आहे. म्हणून राज्यसभा सांसद व उपाध्यक्ष भाजपा श्री.दुष्यंतकुमार गौतमजी यांच्या मार्गदर्शनाने दि.19 सप्टेंबर, 2020 (शनिवार) रोजी वरुळ, ता.शिरपूर, जि.धुळेयेथे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड” माणसाला ऑक्सिजन, सावली, फळे-फुले, सरपण इ. देते, जमिनीची धूप रोखण्यास मदत करते हे सर्व आपल्याला निशुल्क विविधांगी झाडांमुळे मिळते. म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. असे आव्हान नितीन कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.नितीन सुदाम कोळी, टोकरे कोळी युवा मंच संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा कामगार आघाडी शहादा तालुकाध्यक्ष, टोकरे कोळी युवा मंचचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक भैय्यासाहेब सावळे, नामदेव थोरात (सामाजिक कार्यकर्ता), महेंद्र निकुम, प्रशांत वाकडे,विकास कोळी, निलेश कोळी, सुरज कोळी, इत्यादी, वृक्षारोपण करणारे सर्व बालगोपाल, वरुळ येथील ग्रामस्थ बांधव तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी परिश्रम घेतले.







