अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून एकमेकांना चॉपरने खुपसलं; चौघांना अटक

जळगाव (प्रतिनिधी) – अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून १३ सप्टेंबर रोजी दोन गटात कुसुंबा येथे तूंबळ हाणामारी झाली होती. यात एकावर चॉपरने वार केला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच खासगी हॉस्पिटल समोर एकावर आठ ते दहा जणांनी चॉपरने हल्ला केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार जणांना जिल्हा पेठ पोलिसांनी काल (दि.२२) अटक केली.
सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (वय-२८, रा. समता नगर), मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (वय-२२, रा. हुडको पिंप्राळा), अजय देवीदास सपकाळे (वय २१, रा. बुध्दविहार हुडको पिंप्राळा) आणि राकेश अशोक सपकाळे (वय २२, रा. समता नगर) अशी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here