विराटने घेतला शाहरुखशी पंगा?

युएई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा अत्यंत आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. अनेकदा त्याला आपण मैदानावर विरोधी संघातील खेळाडूंशी पंगा घेताना पाहतो. या पार्श्वभूमीवर विराटचा हा फोटो पाहून त्याचं शाहरुखची भांडण झालं होतं की काय? असं वाटतं. परंतु खरं तर असं काहीही घडलं नाही.
करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे आयपीएलचा १३वा सीझन सध्या युएईमध्ये सुरु आहे. IPLचे सामने यंदाच्या वर्षी प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये बसून पाहाता येणार नाहीत. तरी देखील चाहत्यांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. किंबहुना दरवर्षी पेक्षा अधिक उत्साहाने लोक IPLचा आनंद घेत आहेत. या उत्साहाच्या वातावरणात सध्या विराट कोहली आणि शाहरुख खानचा एक जुना फोटो जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विराट शाहरुखशी पंगा घेताना दिसत आहे.
RCB विरुद्ध KKR मॅच संपल्यानंतर शाहरुख विराटचं कौतुक करण्यासाठी मैदानात आला होता. त्यावेळी त्यांनी थोडी गंमत म्हणून भांडणाचा आव आणला. याक्षणी काढला गेलेला हा फोटो फिल्म फेअरने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. हा फोटो सध्या IPL स्पर्धेच्या निमित्ताने सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here