नव्या लूकमुळे मंदिरा बेदी झाली ट्रोल

मुंबई (जॉनी वाझ) – बॉलिवूडची अभिनेत्री मंदिरा बेदी ही ४८ वर्षांची आहेत. मात्र तिच्याकडे पाहिल्यानंतर यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. मंदिराची फिट बॉडी पाहून ती एवढ्या वयाची आहे हे नजरेला पटत नाही. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटोशूट करीत असते व ते सोशल मिडीयावरही शेअर करत असते. मात्र सध्या तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.मंदिराने साडीवरचे दोन फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आहे. हे फोटो टाकताच अनेक लोकांनी तिला चांगलेच फैलावर घेतले. अर्थात काही लोकांना तिचा हा लूक आवडला मात्र काहींना तो ओव्हर स्टाईलिश वाटला. या सर्वांनी तिला ट्रोल केले आहे. ही साडी आहे, बिकीनी आहे की लुंगी? असा प्रश्न विचारत अनेक युजर्सने तिला सुनावले आहे.
अशी साडी नेसून कोणी कोणासमोर कसे जाऊ शकेल? असे देखील एका युजरने लिहिले आहे. मंदिरा याआधीदेखील बोल्ड फोटोंमुळे ट्रोल झाली आहे. मात्र याचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. यामुळेच की काय तिने बोल्ड फोटो शेअर करणे सोडले नाही. मंदिराने १९९९ मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले आहे. तिला ९ वर्षाचा मुलगा असून, अलिकडेच मंदिरा साहो या चित्रपटात दिसली होती. करिअरसाठी मंदिरा जवळपास १२ वर्षे आई होणे टाळत होती. कारण प्रेग्नेंट राहिल्यास आपले करिअर संपेल अशी तिला भीती होती, असे मंदिराने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here