ग्रामीण भागातील एक बहुआयामी,जिंदादिल व्यक्तिमत्व – यशवंत निकवाडे

(दोंडाईचा संतोष कोळी)
वर्शी ता.शिंदखेडा येथील रहिवाशी यशवंत निकवाडे हे ह्या लहान गावात जन्मले असून त्यांनी आपल्या कामगिरीचा जोरावर त्यांचे,परिवाराचे,व गावाचे नाव रोशन केले आहे.गरीब कुटुंबात जन्म झाल्यावर सुद्धा आपल्या मेहनतीचा जोरावर परीस्थिती नसताना पदव्युत्तर शिक्षण (M.A.English)पुर्ण केले.शिक्षण पूर्ण करून ते गावातच आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या हातून आतापर्यंत अनेक विद्यार्थी शिक्षण घेवून गेले.
त्यांचे 100 पेक्षा जास्त विद्यार्थी चांगल्या नोकरीला( वर्ग 1अधिकारी,डॉक्टर,इंजिनिअर,प्राध्यापक, शिक्षक, ग्राम सेवक,तलाठी,नर्स, शिपाई ई.) लागलेले आहेत. सरांना लिहण्याची आवड होती.आतापर्यंत सरांनी चार पुस्तके लिहलेली आहेत ( जगण्याची संजीवनी,यशरंग, आता इंग्रजी बोला बोटांवरून ओठांवर, हास्य कल्लोळ ई.) समाज सेवेची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती.
या कोरोना काळात तर सरांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून अनेक गोरगरीबांसाठी मदतीला धावून गेले.सरांचे वक्तृत्व उत्तम आहे.ते खूप छान बोलतात म्हणून अनेक ठिकाणी त्यांना सूत्रसंचालक म्हणून आमंत्रित केले जाते.सरांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले आहे.त्यांचे सूत्रसंचालन ऐकणे म्हणजे ऐकणार्‍यांसाठी मोठी पर्वणीच असते.त्यांचे आतापर्यंत अनेक शाळा ,कॉलेज मध्ये व्याख्याने झालेली आहेत. हळू हळू परीसरात सरांचे नाव चर्चेली जावू लागले.आतातर सरांनी आपल्या नावाचा ठसा पुर्ण राज्यात ऊमटवला आहे.
लाॅकडाऊनच्या या काळामध्ये सरांनी अनेक कविता लिहिल्या .ते एक उत्तम कवीपण आहेत. त्यांनी लिहिलेल्या कवितांना चांगली दाद मिळाली.सरांचा अध्यापनाचा विषय इंग्रजी आहे.चित्रकलेचे कुठलेच शिक्षण घेतले नसून त्यांना चित्रकलेची चांगली आवड आहे.त्यांनी लाॅकडाऊनच्या काळात अनेक महापुरूषांची,निसर्ग, कल्पक, आभासी चित्र काढली.त्यांनी काढलेल्या या चित्रांना राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला.सरांना राज्यभरातून अभिनंदनाचे फोन येवू लागले.सरांची चर्चा सर्वत्र होवू लागली.
आतापर्यंत सरांचा कार्याची दखल घेत 40 पेक्षा जास्त पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.एवढे अष्टपैलु, बहुआयामी, जिंदादिल व्यक्तीमत्व असून स्वभावाने अतिशय विनम्र आहेत. कुठलाही अहंकार, गर्व त्यांच्या अंगी नाही.अस हे गोड व्यक्तीमत्व आपल्या खान्देशातलं आहे ही आपल्यासाठी आनंददायी गोष्ट आहे.अशा प्रकारचे बहुआयामी,जिंदादिल व्यक्तीमत्वास पुढील वाटचालीस बुलंद पोलिस टाइम्सतर्फे मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here