मुंबई (विशेष प्रतिनिधी) – सरकार कोणाचेही असो मराठा समाजाला सरकार घाबरत पण ओबीसी समाज राजकीय दूरदृष्ट्या जागृत आणि संघटनांत्मकदृष्ट्या आक्रमक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला भविष्य नाही 340 जातीना एकत्र आणणे कठीणच आहे, खासदार अमोल कोल्हे म्हणतात ओबीसी ने मोठं मन केल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. मंत्री छगनराव भुजबळ म्हणतात मी जन्माने ओबीसी असलो तरी माझ्या वर संस्कार मराठा म्हणून आहेत. ओबीसी समाज्याच्या लोकांनो आभार माना डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे ज्यांनी ओबीसी समाजासाठी आरक्षण व्यवस्था करून दिली ह्या जगात पुन्हा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखे व्यक्ती पुन्हा जन्माला येणे अशक्य आहे, असे वक्तत्व ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केले.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाने एक आंदोलन केले तर सरकार त्यांना तात्काळ अनेक योजना लागू करते आणि ओबीसी समाज बोंबा मारून मारून थकून गेला तरी ओबीसी ना कोणी विचारात घेत नाही हे ओबीसी समाजाचे दुर्देव आहे त्याचे कारण ओबीसी समाज पूर्ण विखुरला आहे प्रत्येक जातीचा पुढारी आहे आणि ह्या सर्व पुढरीना एकत्र आणने कठीण आहे हे राज्यकर्त्याना माहीत आहे ओबीसी मध्ये निवडून आलेले ओबीसी नेते हे त्यांच्या पक्षाच्या दावणीला बांधले आहेत. सर्व राजकीय पक्षाचे ओबीसी सेल हे फक्त ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांची बोळवण करण्यासाठी ठेवले आहेत.
ओबीसी समजाचे निवडून आलेले नेते ओबीसी समाजाबद्दल मावशीचे प्रेम दाखवतात पण छाती ठोकून पुढे कोणी येताना दिसत नाही शिरूर लोकसभा खासदार अमोल कोल्हे पार्लमेंटमध्ये म्हणतात की ओबीसी समाजाने मोठेपण दाखवले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि छगन भुजबळ म्हणतात मी ओबीसी समाजामध्ये जरी जन्म घेतला तरी माझ्यावर संस्कार मराठा जातीचे आहेत काय बोलावे ह्या नेत्यांना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांला पडलेला प्रश्न आहे ओबीसी बद्दल काय प्रेम आहे. यात यांची चुकी नाही कारण यांना मराठा नेत्यांचे घरी धुण धुवायचे आहे मालकला नाराज करून कसे चालेल दुर्देव आहे ओबीसींचे.
जातीचा दलित माणूस प्रकाशजी आंबेडकर हे ओबीसी समाजासाठी धावून येतात मराठा समाजाला सांगतात की ओबीसी आरक्षणाच्या पाठी लागू नका केंद्रीय पातळीवर मराठा समाज टक्क्याने कमी आहे.ओबीसी समाजातील प्रत्येक जातीच्या लोकांना वाटत मी ओबीसीच्या नावाने चमकलो पाहिजे चमका चमकी नंतर करा अगोदर आहे ते आरक्षण वाचवा आक्रमक भूमिका घ्या राजकीय दुरष्ट्या जागृत व्हा नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीला कुत्राही ही विचारणार नाही, असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.







