मुंबई (विशेष प्रतिनिधी) – माळी समाजाच्या मागण्या देशपातळीवर लोकसभेत मांडण्यात याव्या यासाठी खासदार रावसाहेब पाटील दानवे.(दादा) केंद्रीय राज्यमंत्री, ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय माळी समाजाच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या व्यासपीठावरून राज्यभरातील सर्व माळी समाज बांधव यांच्याशी सवांद साधणार आहेत.
माळी समाजाचे अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघ यांच्या वतीने राज्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व माळी समाज बांधव यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे (दादा) हे ह्या आठवड्यात आपल्या सर्वाशी संवाद साधणार आहेत. प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन यांनी केंद्रीय राज्यमंत्री यांना माळी समाजाला मार्गदर्शन करावे अशी विनंती केल्यावर त्यांनी अधिकृत वेळ दिला आहे. सर्वांना झुम मिटिंग लिंक लवकरच पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील माळी समाजातील सर्व बुद्धीजीवी समाज बांधवांनी ह्या ऑनलाईन झुम मिटींगला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या मोबाईलमध्ये झुम एप नसेल त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये झुम एप डाऊन लोड करून घ्यावे.महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जे अधिकृत पदाधिकारी आहेत त्यांनी मिटींग ला उपस्थित राहणे आवश्यकच आहे.कोणीही कारणे सांगू नये महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अधिकृत पदाधिकारी यांनी महासंघाचे नियम मोडले किंवा सबळ कारणा शिवाय मिटींगला उपस्थित नाही राहिल्यास प्रदेश पातळीवरुन त्यांना महासंघातून कमी करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी.झुम मिटींगची तारीख व वेळ लवकरच सर्वाना पाठवण्यात येईल.







