बॉलिवूडमध्ये ड्रग्स कल्चरबाबत शर्लिन चोप्राचा मोठा खुलासा

मुंबई (गणेश तळेकर) – बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं जाळं कसं पसरलं आहे आणि यामध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावं पाहून त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत सिने इंडस्ट्रीमधील अनेक जण आपला अनुभव सांगत आहेत. अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने देखील तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, इंडस्ट्रीमध्येही ड्रग्सचा ट्रेंड आहे आणि एका पार्टीत तिने स्वत: बर्‍याच सुपरस्टार्सच्या बायकांना कोकेन घेत असल्याचे पाहिले आहे.
शर्लिन चोप्रा हिने वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ती आयपीएलच्या एका पार्टीत सामील झाली होती. जी केकेआरच्या विजयानंतर देण्यात आली होती. ‘केकेआरचा सामना पाहण्यासाठी मी कोलकाताला गेले होते. सामना संपल्यानंतर नंतर मी पार्टीतही गेली होती. तिथे मी पाहिले की क्रिकेटर्स, बॉलिवूड सेलेब्स सारे ‘दम मारो दम’ करत होते. जेव्हा मी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेले तेव्हा तिथे जे काही सुरु होतं ते पाहून मला तर धक्काच बसला. त्या साऱ्याजणी पावडरसारखे सर्व काही तरी घेत होत्या.
बॉलिवूड स्टार्सना लक्ष्य करताना शार्लिन चोप्रा म्हणाली की, आम्ही त्यांच्या बॅगची किंमत, त्यांच्या चपलांची किंमत इत्यादीबद्दल वाचतो, पण आता आपल्याला माहित असलं पाहिजे की, ही माणसे कोणता ‘माल’ घेतात. ज्या लोकांना आपण देवी देवता म्हणून मानत आलो आहोत, आता त्यांचे वास्तव समोर आले आहे. ही लोक कुठे आणि कधी ‘माल’ घेतात, हे आता एनसीबीकडे जाऊन सांगतील.’
मात्र या मुलाखतीत शर्लिन चोप्राने कोणत्याही स्टार किंवा क्रिकेटरचे नाव घेतलेले नाही. ती म्हणाली की, एनसीबीने आपल्याला बोलविल्यानंतर सर्वांची नावे सांगेल. कारण त्या प्रत्येकाचे चेहरे तिला आताही आठवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here