दिल्ली येथे नंदुरबारच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी घेतली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.अनुराग ठाकूर यांची भेट

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार येथील प्राप्तिकर विभागाचे कार्यालय नंदुरबारहुन धुळे येथे वर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी व करदात्या नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब खा.डॉ. हिनाताई विजयकुमार गावित यांच्या निदर्शनास आल्यानंतर मंगळवारी (दि. २२) त्यांनी यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.
जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कामानिमित्त धुळे येथे जाणे गैरसोयीचे व वेळेचा अपव्यय करणारे असल्याने जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे असलेले नंदुरबार प्राप्तीकर कार्यालय नंदुरबार येथे पुर्ववत सुरू ठेवावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही ही विनंती खा.डॉ.हिनाताई गावित यांनी केली.
या मागणीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.अनुराग ठाकूर यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here