वर्तक नगर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष मोरे व पोलीस शिपाई गजेंद्र सोनटक्के यांना पोलीस बॉईज असोसिएशनकडून छत्रपती शौर्य पुरस्कार

विविध क्षेत्रातील मान्यवर कोरोनायोद्धा गौरव 2020 पुरस्काराने सन्मानित

श्री सोनटक्के व श्री मोरे पोलीस कॉन्स्टेबल या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी तलावात उडी मारुन त्या महिलेचा जीव वाचवला आहे त्यांना छत्रपती शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – बुधवार (दि. 23) पोलीस बॉईज असोसिएशन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष मोरे व पोलीस शिपाई गजेंद्र सोनटक्के यांनी पाण्यात बुडत असलेल्या महिलेचा जीव वाचविल्याबद्दल त्यांना छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वर्तक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक संतोष मोरे व पोलीस शिपाई गजेंद्र सोनटक्के हे उपवन परिसरात पेट्रोलिंग करताना एका महिलेने उपवन तलावात जीव देण्यासाठी उडी घेतली असता ती महिला पाण्यात बुडत असताना पोलिस कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या महिलेला जिवंत बाहेर काढून आपल्या जिवाची पर्वा न करता त्या महिलेला जीवदान दिले त्या दोन पोलिस कर्मचार्‍यांच्या शौर्याची दखल म्हणून पोलीस बॉईज असोशियन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती यांच्या मार्फत ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्यामार्फत वर्तक नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना छत्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे याबाबत शिफारस पोलीस बॉईज असोशियनमार्फत करण्यात आलेली आहे.
गेल्या 8 महिन्यापासून राजकीय क्षेत्रातील कोरोना महामारीमध्ये गरीब व गरजू लोकांना मदत करणारे भाजपाचे आमदार संजय केळकर व युवा पिढीचे मार्गदर्शक असणारे आमदार डॉ निरंजन डावखरे यांना कोरोनायोद्धा गौरव 2020 सन्मानपत्र ने सन्मानित करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग ठाणे येथील पोलिस हवालदार बाळासाहेब भिसे, दादासाहेब कोळेकर, महादेव जाधव, पोलीस नाईक अतुल पाटील यांनासुद्धा कोरोनायोद्धा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोरोना महामारीमध्ये ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी ,कर्मचारी यांचे सुद्धा योगदान खूप मोठे आहे. आपल्या परिवाराची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र पोलीस अधिकारी ,पोलीस कर्मचारी ,टीएमसी अधिकारी व कर्मचारी बांधवानी 24 तास सेवा देऊन देव माणूस म्हणून जनतेची काळजी घेत कोरोना संसर्गाची दोन हात करत आपले कर्तव्य पार पाडले आहे त्यांच्या कार्याची दखल म्हणून TMCच्या सौ नयना ससाणे, सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती , जयंत गायकवाड, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, किरण भोसले जिल्हा परिषद कर्मचारी , ओमकार नाखवा अतिक्रमण कर्मचारी यांनासुध्दा कोरोनायोद्धा गौरव सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
ठाणे वर्तक नगर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे MD डॉ.अमोल गीते व डॉ.अभिजित पंचोली हे निःस्वार्थपणे कोरोना पेशंटची सेवा करत आहे त्यांच्या कार्याची दखल म्हणून त्यांनासुद्धा कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार विजेते व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना पोलीस बॉईज असोशियन मार्फत संस्थापक रवी वैद्य, धीरज पार्सेकर, सुशील मोरे, अमोल माने, अमोल पटेकर, प्रकाश शेरे, नामदेव साळवे व महिला आघाडी सौ प्रबोधिनी कांबळे, सौ प्रिती खानेकर यांनी आभार व्यक्त करून भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here