मानसिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल विशाल शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – येथील राहिवासी अभिषेक देवेंद्र विश्वकर्मा यांचे वडिल लालबहादूर विश्वकर्मा (वय ४१) यांनी विशाल शिंदे यांच्याकडून 20 हजार उसनवारी घेतले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे पैसे देऊ शकत नसल्यामुळे विशाल शिंदे सतत मानसिक छळ करीत असल्याने, अभिषेक विश्वकर्मा यांच्या वडीलांनी आत्महत्या केली. त्यामुळे वडीलांना आत्महत्येस विशाल शिंदे प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अभिषेक विश्वकर्मा यांनी केली होती.

अभिषेक देवेंद्र विश्वकर्मा

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल शिंदे हे लालबहादूर विश्वकर्मा यांच्याकडे सतत पैशाची मागणी करुन मानसिक त्रास देत होते. जाता-येता टोमणे मारत होते. पैसे देत नसल्यामुळे आरोपी विशाल शिंदे यांनी विश्वकर्मा यांच्या घरी जाऊन लालबहादूर यांना मारहाण केली होती. या सर्व प्रकाराने त्यांची परिसरात बदनामी झाली होती याचेच त्यांना नैराश्य आले होते. विश्वकर्मा यांच्या आईलासुद्धा विशाल शिंदे हे नियमित वाईट शिवीगाळ करत असे. यामुळे लालबहादूर विश्वकर्मा सातत्याने दबावाखाली राहत असत. अखेरीस या नैराश्याचा परिणाम म्हणजे त्यांनी कंपनीच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती अस्वस्थ असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. विश्वकर्मा यांच्या मुलांनी वडीलांना वाचविण्यासाठी शर्थ केली पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
आपल्या वडीलांच्या मृत्यूला विशाल शिंदेच जबाबदार असल्याचा आरोप करीत अभिषेक विश्वकर्मा यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे गु र रजिशन क्रमांक कलम-426/2020 भादवि कलम 306,504,506 प्रमाणे तक्रार दाखल केली होती. संपूर्ण प्रकरणाचा विचार करून आज तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल ढेरे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here