शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वादळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने यां नुकसानीचे पंचनामे ठाणे अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी नंदुरबार जिल्हा यांच्या तर्फे शहादा तहसीलदार यांना देण्यात आले.
जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनांनी आदेश देऊन तलाठी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहाणी करून पिकांचे पंचेनामे करून शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्यात यावी .यावर्षी सुरवातीपासूनच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे आता पर्यत झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांची स्थिति चांगली होती परंतु 15 सप्टेंबर पासून सतत होत असलेल्या वादळी पावसामुळे मूग ,सोयाबिन मका ,ज्वारी,बाजरी, कापूस यां सारखे पिकांचे नुकसान झाले आहे .
त्यामुळे या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहूजन युवा आघाडीचे जिल्हा उपाद्यक्ष दिनेश सामुद्रे यांनी केली आहे व वंचित बहूजन युवा आघाडी नंदुरबार जिल्हाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहूजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सामुद्रे, शहादा तालुका उपाध्यक्ष गजेंद्र निकम, रविद्रभाऊ मोरे, प्रमोद चव्हाण, अमोल भोई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.








