दोडाईचा (संतोष कोळी) – अप्पर तहसिलदार व दंडाधिकारी दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे कार्यालयात धनगर समाजाने ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना देण्यात आले.
आज संपुर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाचे आंदोलन आहे. धनगर समाजावर गेल्या सत्तर वर्षांपासून अन्याय केला आहे. महाराष्ट्रात धनगड नसून धनगर आहेत.सरकारच्या चुकीच्या नोंदमुळे र – ड झाला आहे. तो दुरुस्त करून धनगर समाजाला एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी व धनगर समाजाला आदिवासीच्या सर्व सवलती मिळाव्यात व मागिल सरकारने एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे तो निधी तात्काळ धनगर समाजाच्या विकासासाठी मिळावा मेढपाळ बांधवांचे हल्ले थांबवण्यासाठी संरक्षण द्यावे.
दोंडाईचा धनगर समाजाने पारंपरिक ढोल डांखा वाजून सरकारचे लक्ष्य वेधले यावेळी कोरोना व्हायरस महामारीच्या सर्व नियमांचे पालन केले.निवेदन देतांना धनगर समाज संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष सुनिल धनगर,युवा मल्हार सेना अध्यक्ष वाल्मिक धनगर,अॅड ज्ञानेश्वर पाटील,नगरसेवक शैलेश बोरसे,प्रमोद धनगर,गटु धनगर,सुनिल तेले, टायगर धनगर,कमलाकर बागले, मल्हारी गोराणे,ज्ञानेश्वर बागुल,यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.




