केंद्र सरकारची शेतकरी विरोधी विधेयकांना चोपड्यात विरोध

तहसीलदारांना निवेदन सादर २८ला शेतकरी जनजागरण सभा

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले तिन्ही शेतकी अध्यादेश आणि लोकसभेत पास केलेल्या विधेयकांना कडाडून विरोध म्हणून रस्ता रोको भारत बंद आंदोलन करण्यात आले चोपडा तालुका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे ही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले..
निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारची शेतकरीविरोधी तिन्ही विधेयके, नवीन वीज विधेयक २०२० हे कार्पोरेट धार्जिणी असून त्याविरोधात व डिझेल व पेट्रोलची प्रचंड दरवाढ याविरुद्ध जनजागृती व्हावी येत्या 28 सप्टेंबर शहीद भगतसिंग यांच्या 114 वी जयंती शेतकरी जनजागृती दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे.
या तिन्ही विधेयकांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल, तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील. कंपन्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी कंत्राटी पद्धतीने कसण्यास घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल व शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढेल हे विधेयक पास होण्याचा दुष्परिणाम म्हणजे कांदा निर्यात बंदी असताना कांद्याचे भाव साठेबाजांनी 40 रुपये किलो प्रमाणे केले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे चोपडा तहसीलदार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी अमृत महाजन, रईस खान, शांताराम पाटील, अनंत चौधरी तसेच श्याम पाटील, संतोष पाटील, मोहन माळी.यांनी नायब तहसीलदार श्री. सय्यद तसेच चोपडा शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here