जळगाव (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दक्ष पोलीस टाईम्सचे संस्थापक तसेच धुळे जिल्ह्यातील खलाणे गावचे सरपंच तथा गटनेते विजय टाटीया व सौ मीना टाटीया यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम देऊन सन्मानित केले. त्या प्रसंगी माजी नगरसेवक राकेश पाटील, सौ सोनाली पाटील, दक्ष पोलीस टाइम्सचे संपादक किरण सावंत, केसरी मॅन्यूफॅक्चरचे मालक मयुर टाटीया, ॲड.भाग्यश्री टाटीया उपस्थित होते.








