खुनाचा प्रयत्न तसेच अॅट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – सोमवार ( दि २८) बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमी वरून माळेगाव येथे सासवड पो स्टे गु र नं १०६/२०२० भा द वी 307,324 , सह अनु जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989 कलम 6 सुधारीत कायदा 2015 चे 3(१) (r)(s) 3(2) (va) यातील फरार आरोपी नामे *नितीन उर्फ बापू उल्हास जाधव (वय 32 वर्षे रा इंदिरा नगर ,सासवड ता पुरंदर जि पुणे) हा सहा महिन्यांपासून फरार आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सासवड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे
सदर आरोपी विरोधात सासवड पो स्टे गु र नं 142/2014 भा द वी का कलम 307, 143, 147 इतर, सासवड पो स्टे गु र नं 90/2018 भा द वी का कलम 326,325, 109,34 इतर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा ज्ञानेशवर क्षीरसागर, पो ना विजय कांचन, पो शि धिरज जाधव, पो शि अक्षय नवले यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here