सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी गिरीष पवार) – अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजाराची तात्काळ मदत द्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवार (दि.२८) तहसिलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले..
या निवेदनात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये मदत देण्यात यावी, पीक कर्जासाठी बँक बँक अनावशक कागदपत्राची मागणी करत आहे ते बंद करून शेतकऱ्यांना आवश्यक असतील एवढीच कागदपत्रे मागून घ्यावी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे., कर्ज माफी योजना पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना आज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळत नाहीये त्यांना लवकरात लवकर पिक कर्जाचा लाभ मिळावा., कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने पुर्णताहा उठवावी, शेतकरी धोरण विधयक शेतकरी विरोधी असुन ते कायम स्वरुपी बंद करावा, या मागण्या प्रामुख्याने मागण्यात आल्या आहेत.
सध्या अतिवृष्टी झालेली आहे अनेक शेतकऱ्यांची पिके आज धुळीस मिळाली आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बळीराजा अत्यंत अडचणीत सापडला असून पुरामुळे अनेक भागांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कापसाचे बोंड झाडावरच उगवले. सोयाबीन,उडिद,चवळी,मुंग उभी असताना त्यांना मोड फुटलेले आहे. केळी, व यासह इतर पिकांचे सुद्धा अतोनात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ देण्यात यावी, या बरोबर खरीप हंगाम संपत आलेला आहे तरीसुद्धा पीक कर्ज वाटपातील गोंधळ अजूनही सुरू आहे अनेक बँक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कागदपत्राच्या अडचणी दाखवून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत.
शासनाने निर्देशित केलेल्या कागदपत्राच्या व्यतिरिक्त बँक अनेक अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील ग्रामिण भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत संबंधी अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. त्यासंदर्भात दिनांक.१९/०५/२०२० रोजी आपल्या कार्यालयास कळविले होते परंतु अद्यापही बँकेने कोणतीही दखल घेतल्याची आढळून येत नाही.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले कृषी कर्ज माफी योजना अंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत २००००० लाखापर्यंतचे सर्व पिक कर्ज शासनाने माफ केलेले आहे परंतु अनेक पात्र शेतकर्‍यांची नावे अनेक बँकांनी शासनापर्यंत पोचलेली नाही त्यामुळे अनेक शेतकरी सदर कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेले आहेत.
लवकरात लवकर संपुर्ण कांदा निर्यात बंदी कायदा केंद्र सरकारने उठवावा. शेतकरी धोरण विधायक हे शेतकरी विरोधी असुन यात शेतकरी हा देशोधडीला लागेल हे विधायक कायम हद्दपार कराव आदी मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसिलदारांना यांना निवेदन देण्यात आले.
सदर सर्व मागण्या विषया संदर्भात योग्य ती कार्यवाही करून आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकरींना सध्या दिलासा मिळणे गरजेचा आहे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अस जल समाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाला देण्यात आला असून, यावेळी गोपाल पाटिल ,प्रदिप गायके मनोज महाले,अमोल पाटिल,प्रविण गव्हाडे,राम अपार ,सुनिल कानडजे,प्रदिप भोईटे,संदिप पाटिल,रियाज पिंजारी,विशाल पाटिल,कृष्ण माळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here