प्रतीक हिवराळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

रायगड (जिल्हा प्रतिनिधी सुनिल राठोड) – रविवार (दि.27) ला प्रतीक हिवराळे छत्रपती शिवाजी महाराज सेना विभाग प्रमुख (टायगर ग्रुप रसायनी) यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाकरिता होणारा अनावश्यक खर्च टाळता सामाजिक उपक्रम ठेवण्यात आले होते.
शिवनगर वाडीतील अधिवास विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले व मराठी शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून संदीप शेठ मुंडे माजी सरपंच सचिन तांडेल उपस्थित होते. तसेच सुरज पाटील, विषाल मुंडे, अक्षय बाविस्कर, देवेश जाधव, कुमार राठोड, हर्षल तांडेल, जयेश मोरे, नितेश जाधव, आदर्श नलावडे, दर्शन सावंत किरण बागडे , प्रितम सिंग, गौरव नायक अक्षय चव्हाण संकेत तुपे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here