कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट; ८७८ रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वी मात

corona-negetive

जळगाव जिल्ह्यात आज आढळले २६१ कोरोनाबाधित; ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.२९) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल जळगावकरांना दिलासा देणारा ठरला. पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या संख्येला मोठ्या प्रमाणावर अटकाव झाला असून, आज २६१ कोरोनाबाधित आढळून आले तर दुसरीकडे ८७८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सर्वाधिक ३९ कोरोनाबाधित चाळीसगाव तालुक्यात आढळून आले आहेत.
आज आढळलेल्या २६१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर २८, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २६, अमळनेर ३२, चोपडा १६, पाचोरा ९, भडगाव ७, धरणगाव १९, यावल ४, एरंडोल ३, जामनेर २१, रावेर २९, पारोळा ७, चाळीसगाव ३९, मुक्ताईनगर ११, बोदवड ४ इतर जिल्ह्यातील २ याप्रमाणे समावेश आहे.
दरम्यान, आज ८७८ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३९ हजार ६३१ इतकी झाली आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ३, अमळनेर तालुक्यात २ तर चाळीसगाव, रावेर, यावल, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला असून, सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात ७ हजार १०१ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here