चोपडा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी यांना या कोरोना योद्ध्यांना मानधन वाढ दिली याचेबद्दल समाधान आहे आता अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचारी हेसुद्धा कोरो ना संकटकाळात जोखीम पत्करून काम करीत आहेत त्यांचेबद्दल महाराष्ट्र शासनाने विचार करावा ग्रामपंचायत कर्मचारी यांना तर ४/५,महिनेपासून पाहतच नाहीत प्राव्हींडेंट फंडचा हिशोबच नाही..
सेवानिवृत्त ६६वर्षेवरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना २/३वर्षापासून एकरकमी लाभही दिलेला नाही तरीही महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचारी ही जोखीम पत्करून काम करीत आहेत आता महाराष्ट्र शासनाने यांचे प्रलंबित प्रश्न सोडवयास पाहिजे त्यांचे ताबडतोब १०५००₹ वेतन व किमान ६०००₹ पेन्शन पेन्शन हे प्रश्न अग्रक्रमाने घ्यावयास पाहिजे अशी मागणी जळगाव जिल्हा आयटक प्रणित ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन चे पदाधिकारी सर्वश्री अमृत महाजन ..संतोष खरे. मलखान.राठोड ..संदीप देवरे.. किशोर कनडारे. प्रेमलता पाटील.. ममता महाजन.. चंद्रकला चिंचोरे ..अरुना सपकाळे. अरुणा पवार.. शारदा पाटील.. नीलिमा पाटील..माधुरी चौधरी.. सीमा बागड . वाहिदाबी उषा सपकाळे. जिजाबाई महाजन.. फरीन.. शारदा पाटील मीना कटोले सुनंदा पाटील.. सरला देशमुख, नंदा वाणी आदींनी केले आहे







