महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदुर संघाचा आरोग्य विभागाला दणका

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंढे) – पुणे जिल्हा येथील औंध रुग्णालय या ठिकाणी आज दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ११ वाजता महासंघाच्या पदाधिकारी यांनी भेट देवून जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी संदिप बांगडे यांच्यासमवेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सलग्न भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव गणेश लांडगे, पुणे विभाग प्रमुख किरण पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश मुंढे, पुणे ग्रामीण जिल्हा सचिव ज्ञानेश्वर हिवराळे, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रावते, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुख श्री यशंवत रुपटक्कॆ आणि पुणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष राजगुरु साहेब यांच्या उपस्थित बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय यांचा पगाराचा विषय घेण्यात आला. कोविड आजाराच्या काळात रात्र दिवस सेवा आरोग्य खात्यातील सुरक्षा रक्षकांनी केली. त्याच हे फळ असेल तर आम्ही राज्यकर्त्यांना कॉरन्टाइन करू अस स्पष्ट सांगण्यात आले. तरी येत्या ७ दिवसात पगार नाही झाला तर आमरण उपोषण करु असे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या पदाअधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यास ठणकावून सांगितले.
जर शासन आमची जबाबदारी घेत नसेल, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा फक्त टोप्या जर राजेश टोपे घालत असतील तर आम्ही वळसे पाटलांनी दाखवू देवू की आम्ही किती कडू आहोत. तर आता दे दणका जोरदार, त्याला शासन जबाबदार असा एल्गार करण्याचा निश्चय केला आहे. आगामी काळात हा लढा महाराष्ट्रात तीव्र करण्याचे संकेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदुर संघाने दिले आहेत.pune-bhartiya-majdoor-sangh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here