नवापूर- ट्रामा सेंटर ला 20 बेडचे कोविड सेंटर लवकरच होणार

navapur-collector-visit

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचा नंदुरबार जिल्ह्यात दौरा सुरू असून गुरुवारी (दि.१) दुपारी 11 वाजेच्या सुमारास त्यांनी नवापूर उपजिल्हारुग्णालय तसेच ट्रामा सेंटरची पाहणी केली आहे त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना ट्रामा सेंटरचे लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करा पैश्याची गरज भासल्यास संपर्क करायचा सूचनाही केल्या आहेत
उपजिल्हारुग्णालयातील स्वंयपाक गृहाची यावेळी त्यांनी पाहणी करत ठेकेदाराने ठरवलेल्या दरात जेवण द्यायला कसे परवडते असा प्रश्न करून आश्चर्यही व्यक्त केले आहे
नवापूर तालुक्यात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये 20 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.दोन व्हेंटिलेटर आणि दहा बेड ऑक्सिजनची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दहा दिवसात नवापूर कोविड सेंटर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत नवापूर तालुक्यात जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.नवापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर नवापूर कोविड सेंटर भेट देऊन पाहणी केली.नवापूर शहरातील खासगी रुग्णालयात सुरू असलेले अश शिफा कोविड सेंटर रुग्णालयाला भेट देऊन नवापुर तालुक्यातील बेडकी येथील माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या. तुमच्या कामाची पाहणी केली व स्वतः त्यांनी लहान मुलांचा ऑक्सीमीटरने ऑक्सिजन मोजणी करून आरोग्य विभागाला सूचना दिल्या तसेच तहसील कार्यालयात तालुका अधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली.नाशिक विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्याची कोरोना परिस्थिती हे साधारण झाली आहे आणि सर्वाधिक कमी रुग्ण असल्याची माहितीही जिल्हाधिकारी भारूड यांनी दिले.
नवापूर आतापर्यंत 536 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. ॲक्टिव रूग्ण 61 बरे झालेले 459 मृत्यू रूग्णांची 16 झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here