मुंबई – देशभरासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. सर्वसामान्यांबरोबरच कोरोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील कोरोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये आणखी 77 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असून दोन पोलीस कर्मचार्यांना जीव देखील गमावावा लागला आहे. सध्या 1 हजार 30 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्यांची संख्या आता 59 झाली आहे.







