धरणगाव पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन
धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – उत्तर प्रदेश मधील हाथरास जिल्ह्यातील खेडेगावात मनीषा वाल्मिकी नांवाच्या दलित परीवारातील मुलीवर उच्च जातीचा काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर उलट तिच्या हातापायाची हाडे तोडली जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या अमानूष दुर्घटनेची केस फास्ट ट्रॅककोर्टाच चालवावी म्हणून येथील पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आज मनीषा हयात नसली तरी तिने मृत्यूआधी पोलीसांना दिलेल्या जबानीत सर्व कथन केले आहे. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक केली, दलित परीवारातील मनीषा वाल्मिकी फक्त१९ वर्ष वयाची होती. ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिचा पाळातीवर असलेल्या जातीच्या गुंड नि कायद्याची भीती न बाळगता हे कृत्य केले. उत्तर प्रदेशातील योगी सरकार व केंद्र सरकार याबाबत गंभीर नाही.
आम्ही सर्व महिला शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा मार्गदर्शनाने हे निवेदन सादर करत असल्याचे मत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी व्यक्त करत निवेदनाद्वारे मागणी केली आहे, तर माजी नगराध्यक्ष उषा वाघ यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात दोषीकर कारवाईची मागणी केली आहे. कंगना रानावतला वाय दर्जाचे संरक्षण देतात परंतु दलित मुलीवर बलात्कार झाला तरी 14 दिवस गुन्हा दाखल होत नाही. मनीषा वाल्मिकीला जोपर्यंत न्याय मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेनातर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगराध्यक्षा उषा वाघ यांनी दिला.
यावेळी धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे, , सुनिता लिडांयत , सुनंदा विसावे, वैशाली पवार, गंगा वाघरे, उषा वाघरे, गोरी वाघरे , आरती चडांले, रेखा वाघरे, सुनीता चौधरी, भारतीताई चौधरी, नेहा प्रकाश पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.







