स्व. तपनभाई पटेल साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

tapanbhai-patel-shirpur

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – येथील उद्योगपती, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे बांधकाम सभापती, नगरसेवक तपनभाई मुकेशभाई पटेल यांना वरूळ येथील एच आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली.
विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे यांनी स्व. तपनभाई पटेल यांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आर आर. रघुवंशी, साखर कारखाना संचालक मगला पाटकर, शारीरिक शिक्षक जिल्हा संघटनेचे पदाधिकारी मनोज पाटील, डी ए. जाधव, एस जे.पाटील, एस के.पाटील, एन एस. धिवरे , बी एस. बडगुजर, ए बी.महाजन, पी टी. पवार , एल बी ठाकरे, पारस जैन, बापू भील आदींनी पुष्पांजली अर्पण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here