जगभरातील नागरिक गांधी विचारांचा प्रेमात….प्रा मंगल पाटील

dharangaon-gandhi-jayanti

हेमिंदु नगरमध्ये सार्वजनिक बालोद्यान तरुणाईचे स्वच्छता अभियान

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी. पाटील) – महात्मा गांधी म्हणजे सत्य अहिंसा प्रेम करुणा यांच्या महासागर होय गांधीजींच्या विचारांवर जीवनात प्रतिकूल परिस्थिती वर मात करता येते गांधी विचारांनी समाजासमोर आदर्श निर्माण होतो जगभरातील लोक गांधी विचाराच्या प्रेमात पडलेले आहेत असे मत सेवानिवृत्त प्राध्यापक मंगल आण्णा पाटील यांनी व्यक्त केले धरणगाव येथील विद्युत नगर, हे मेंदू नगर अनिता नगर येथील तरुणांनी भल्या पहाटे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान प्रसंगी ते बोलत होते
तरुणांनी गांधी विचार आत्मसात केल्यास संस्कारक्षम पिढी आणि सुसंस्कृत तरुण निश्चितपणे निर्माण होतील हे तरुण समाजासाठी देशासाठी महत्त्वपूर्ण काम करतील असेही पाटील म्हणाले महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाला सुरवात करण्यात आली तरुणांनी आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात विद्युत नगर हेमेंदू नगर आणि अनिता नगर या तीनही वसाहती चे सार्वजनिक बालोद्यान ची साफसफाई करण्यात आली उद्यानातील वृक्षांना रंग देण्यात आला. तरुणांचा उत्साहाचे परिसरात कौतुक होत आहे या परिसरात तरुण दरवर्षी गणेश उत्सव ,नवरात्र उत्सव,गांधी जयंती अशा काळात परिसर स्वच्छता अभियान राबवित असतात.
यावेळी मंदार चौधरी, महेश पवार,अमोल वाघ ,धनगर काका,वसंत पाटील,प्रल्हाद चौधरी,किरण मोरे,चिन्मय पाटील, नवदीप सिंह पाटील, चेतन पाटील, कोमलेश पाटील, सुमित पाटील, डी एस पाटील,शिवाजी पाटील, आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here