धरणगाव (उपसंपादक प्रा.पी.एम.पाटील) – येथील प.रा.विद्यालयाचे शिक्षक व लोकमत तालुका प्रतिनिधी शरद कुमार बन्सी यांचे कोरोनाने दुःख निधन झाले. त्यांचा प.रा विद्यालयात सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
बन्सी सर हे २५ ते २६ वर्षा पासून धरणगाव येथील प.रा.विद्यालयात शिक्षक होते व त्यांच बरोबर ते लोकमत या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी,महात्मा फुले पतसंस्थेचे संचालक,जळगाव जिल्हा शिक्षकांची पतसंस्थेचे संचालक व चर्मकार समाजाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत होते.
बन्सी सर म्हणजे त्यांचा असा एकही फोटो असा दिसणार नाही की त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नसेल धरणगावातील एक हसतमुख व्यक्ती शाळेत काम करीत असताना गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ते नेहमी मदत करीत असत बन्सी सर हे माजी आमदार हरीभाऊ महाजन यांच्या सोबत अनेक वर्षे त्यांनी काम केले त्यांच्या सोबत मंत्रालयात असेल जळगाव जिल्ह्यात असेल ज्या ज्या वेळेस कार्यक्रम होत त्या वेळेस बन्सी सर हे सोबत राहून हरीभाऊ महाजन यांना नेहमी सहकार्य करत असत. त्याच्याच माध्यमातून महात्मा फुले या पतसंस्थेचे सर संचालक झाले.अनेक वर्षे त्यांनी परिस्थिती गरिबीची असल्याने पायीच घरून निघाले कि सर्वांना भेटून चर्चा करीत परंतु त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही शिक्षक संघटनेच्या माध्यमातून ते टी.डी.एफ या संघटनेचे तालुका अध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषवले आहे.
शाळेत काही मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे असेल त्यांना लोकप्रतिनिधी बोलवायचे असेल की जबाबदारी कायम मुख्याध्यापक व संचालक मंडळ त्यांच्यावर सोपवत व कार्यक्रम सुद्धा ते यशस्वी करायचे. त्याच्या सर्वात जास्त संपर्क संजीवकुमार सोनवणे सर,बी.एन.चौधरी सर,डी.एस.पाटील सर यांच्याशी असायचा गावात तर सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क असायचा.
त्यांना ज्याही वेळेस जळगाव जायचे असेल त्यांची पतसंस्थेचे मिटिंग असली की ते पी.एम.पाटील सर कुठे आहेत जळगावला जाणार तेव्हा मला कॉल करा मला जायचे आहे.ज्या दिवसापासून त्यांनी मातोश्री नगरमध्ये रहिवास केला तेव्हा पासून अनेक वेळा त्यांना मी माझ्या गाडीत सोबत घेऊन जात असे तेव्हा गाडीत सामाजिक,राजकीय चर्चा आम्ही करीत असू धरणगाव शहरातील मी असा व्यक्ती आहे सर्वात जास्त त्याच्या सोबत मी प्रवास केलेला आहे.येतांना जातांना,त्या वेळेस एखाद्या ठिकाणी बसलो की सर्व सुख दुःखाच्या गोष्टी एकमेकांना आम्ही शेअर करत असु त्यांनी अनेक संकटांशी लढा दिला आहे. घरची परिस्थिती नाजूक त्यातल्यात्यात मोठ्या भावाने त्याचा सर्वच सांभाळ केला एकत्रित कुटुंबात राहत असतांना अनेक अडी अडचणी येत असत.त्यांचे मोठे बंधू ईश्वर बन्सी यांनी खऱ्या अर्थाने वडिलांचे छत्र हरपल्या नंतर सरांचा सांभाळ केला त्यांना शिक्षणापासून तर नोकरी लागेपर्यंत संपूर्ण मदत केली राम-लक्ष्मण सारखी दोघा भावांची जोडी होती अनेक वर्षापासून एकत्रीत कुटुंब पद्धतीत कसे राहावे ते त्यांच्या दोघां भावापासून शिखण्या सारखे होते.
भानुदास विसावे,पांडुरंग अण्णा सातपुते,धर्मराज मोरे या चर्मकार समाजाच्या नेत्या सोबत अनेक समाजयोगी कार्यक्रम करून त्यांना समाज बांधवाना न्याय मिळवून दिला होता.आपण नेहमी म्हणत असतो मरावे परी कीर्ती रुपी उरवावे तसे बन्सी सर होते.
मी तर मित्रांनो सर्वांन हेच सांगेन आपण जो पर्यंत जिवंत आहोत तो पर्यंत असे काही काम करा की त्याचा आपल्या समाजाला काहीतरी उपयोग होईल जे निराधार असतील,दिव्यांग असतील, रंजले गाजले असतील त्यांना शक्य होईल तेवढी मदत करीत रहा मी,माझ्या परिवार, माझे,नातेवाईक यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही आहे याचा विचार करावा स्वार्थ त्यागुन परमार्थ करा प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे कोणी पहिल्या गाडीने कोणी दुसऱ्या गाडीने.
आपण फक्त एखादा चांगला व्यक्ती चांगला कार्यकर्ता वेळेच्या आधी तुम्हा आम्हाला सोडून जातो तेव्हा आपण हळहळ व्यक्त करतो श्रद्धांजली वाहतो आई,वडील गेल्यावर श्रद्धांजलीसाठी खूप खर्च करतो दानधर्म करतो परंतु माझे वैयक्तिक असे मत आहे.
मोठ्या माणसांना श्रद्धांजली जरूर वाहण्याच्या कार्याची प्रशंसा करा परंतु व्यक्ती जिवंत असताना त्या वेळेस त्याला मदत केली गेली तर ते जास्त मोलाचे असते. एका गाण्याची ओळ आठवते.
प्यासे को पानी ना पिलाये तो क्या फायदा बाद अमृत पिलाया तो क्या फायदा
म्हणजे ज्यावेळेस खऱ्या अर्थाने मदत करायला पाहिजे त्यावेळेस जर आपण मदत केली नाही आणि नंतर त्याच्या काय उपयोग वी.स.खांडेकर नेहमी म्हणत नमे सो भारी नम्रता ही महत्त्वाची आहे.आपण जेवढे दिवस जिवंत जगू तेवढे दिवस कोणाची निंदा करू नका,कोणाला वाईट म्हणू नका त्यांच्या तोंडावर स्तुती आणि मागे शिव्या देऊ नका एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपण आपला मार्ग बदलून कार्य करत रहा.
शरद कुमार बन्सी सर यांना सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी डी.जी.पाटील, डी.आर पाटील, .गुलाबराव वाघ, भानुदास आप्पा विसावे, संजय महाजन, डॉ. मिलिंद डहाळे, जानकीराम पाटील, संजू महाजन, निलेश चौधरी, कैलास माळी, बी.एन.चौधरी, डॉ.संजीव कुमार सोनवणे, डी.एस.पाटील, भागीरथ पाटील, श्री.बेलदार आदी मान्यवरांनी श्रद्धांजली दिली.







