कळवे – पेण येथे श्रमिक थळ सामाजिक विकास संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

alibaug-blood-donation

रायगड अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीआणि भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्री यांच्या जयंतीनिमित्त कळवे – पेण येथील “श्रमिक थळ सामाजिक विकास संस्थेचे” रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात ७७ श्रमिक मुर्तीकारांनी केले रक्तदान केले.
दि.२ आँक्टोबर “राष्ट्रपिता महात्मा गांधी ” आणि “भारताचे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्री” यांच्या जयंतीनिमित्त तसेच “राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान सप्ताह निमित्ताने”
श्रमिक थळ सामाजिक विकास संस्थेच्या वतीने मु.कळवे पो.जोहे ता.पेण येथील ग्रामीण भागातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोविड कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेत भितीचे वातावरण असून सुध्दा सनिटायझर, सोशल डिस्टंशिंग,मास्क् इ. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून श्रमिक थळ सामाजिक संस्था कळवे-पेण यांनी सामाजिक बांधिलकी जपून एकूण ७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले . ज्या श्रमिक मंडळींकडून श्री गणपती च्या मुर्ती तयार केल्या जातात त्यापैकी ७७ मुर्ती कारागिरांनी रक्तदान केले.
सदर शिबिरात महिलांनी देखील उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. सदर शिबिरात यावेळी कोरोना संकटकाळात दादर-हमरापुर विभाग, पेण येथील डॉ. संजय ठाकूर यांनी रुग्णांना सामाजिक बांधिलकी जपून रुग्णसेवा दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रमिक ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. डॉ.संजय ठाकूर म्हणाले कि,रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा माझ्या साठी असून यापुढे ही मी सामाजिक बांधिलकी जपून माझी सेवा सर्वासाठी असेल यावेळी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी डॉ. संजय ठाकूर यांच्या सेवेबद्दल मनोगत व्यक्त केले. alibaugतसेच अलिबाग रक्तकेंद्राचे( रक्तपेढी)डॉ. दिपक गोसावी यांनी सांगितले कि,जगात/देशात कोरोना विषाणूचे संकट असून सुद्धा कोणतीही भिती न बाळगता त्या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून रक्तदान केले त्याबद्दल जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आभार मानले .
सदर रक्तदान शिबीरात जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड रक्तकेंद्राच्या(रक्तपेढी)वतीने डॉ. दिपक गोसावी(रक्तसंक्रमण अधिकारी),हेमकांत सोनार, पुनम पाटील, प्रज्ञा पवार, महेश घाडगे, संकेत घरत आदिंनी संकलनाचे काम केले.
सदर रक्तदान शिबीर यशस्वी करणे साठी अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष सौ.प्रज्ञा धनाजी पाटील, सचिव सुधीर पाटील, बाळकृष्ण पाटील, सतीश पाटील गोरखनाथ पाटील, मारुती पाटील, भाऊराव पाटील, सुजित कुमार पाटील, काशिनाथ पाटील, मनोज पाटील, सुधीर पाटील,देवानंद सर, अविनाश पाटील, प्रसाद पाटील, राजाराम पाटील, विनायक पाटील, नरहरी पाटील, राजेंद्र पाटील, आदि थळ कमिटी, नवीन पाटील, संजय पाटील,साक्षी पाटील, सुचिता पाटील, सुषमा पाटील, रोहिणी पाटील, राजेश्री पाटील, तसेच समस्त मुर्तीकार आणि ग्रामस्थ आदिंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here