फैजपूर येथे स्व पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती सेवासप्ताहाची सांगता

raver-bjp

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे व खा रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक तथा भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रखर राष्ट्रभक्तीचे उपासक स्व .पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची १०४ वी जयंती निमित्ताने भाजपा महाराष्ट्र पूर्व घोषित सेवा सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. या सेवा सप्ताह चा सांगता समारोप कार्यक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार रोजी फैजपूर नगरीत खंडेराव वाडी येथे संपन्न झाला.

या सोहळ्याला भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील, मासाका चेअरमन शरद महाजन, नगराध्यक्ष महानंदाताई होले, जिल्हा परिषद सदस्य सविताताई भालेराव, जिल्हा सरचिटणीस डॉ विजय धांडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हर्षलभाऊ पाटील, जिल्हा दूध संघ संचालक हेमरजभाऊ चौधरी, माजी नगराध्य पिंटूभाऊ राणे,भाजप पालिका गटनेते मिलिंद बापू वाघूळदे, माजी सभापती भरतभाऊ महाजन,तालुका सरचिटणीस विलसभाऊ चौधरी, उज्जनसिंग राजपूत, नितीनभाऊ राणे, फैजपूर भाजप अध्यक्ष आनंताभाऊ नेहते, राकेशभाऊ फेगडे, यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here