आज आढळले ३२२ कोरोनाबाधित; एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.२) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर ३२२ कोरोनाबाधित आढळून आले तर याच संख्येच्या जवळपास अडीचपट ८८९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जळगाव शहरासह मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात आज संसर्ग वाढलेला आढळून आला.
आज आढळलेल्या ३२२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-६९, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२८, अमळनेर-१४, चोपडा-२५, पाचोरा-१७, भडगाव-१६, धरणगाव-४, यावल-१४, एरंडोल-५, जामनेर-६, रावेर-५, पारोळा-६, चाळीसगाव-१९, मुक्ताईनगर-७७, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यांमधील २ असा समावेश आहे.
दरम्यान, आज ८८९ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून, आत्तापर्यंत ४२ हजार ४५४ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार १९१ झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५ हजार २७२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







