खांब प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वास्तूचे उद्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन

aditi-tatkare

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, जिल्हा रुग्णालयाच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय रोहा अंतर्गत येणाऱ्या नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणाऱ्या खांब येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वास्तूचे उद्घाटन उद्या शनिवार दि.०३ आ‌ॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
रोहा तालुक्यातील मौजे खांब येथे संपन्न होणाऱ्या या उद्घाटन समारंभासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे,रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु.योगीता पारधी,आ.जयंत पाटील,आ.रवीशेठ पाटील,आ.अनिकेत तटकरे,आ.निरंजन डावखरे,आ.बाळाराम पाटील,आ.महेंद्र दळवी,राजिप चे उपाध्यक्ष सुधाकर घारे,राजिप च्या अर्थ व बांधकाम सभापती श्रीमती निलिमा पाटील,राजिप सदस्य आस्वाद पाटील,राजिप सदस्य दया पवार,रोहा पंचायत समितीच्या सभापती श्रीमती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, खांब ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सुरेखा वाघमारे तसेच रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती नीधी चौधरी व राजिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ.सुधाकर मोरे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) के.बारदेस्कर रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारीजयेंद्र जाधव, रोहा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here