नंदुरबार काँग्रेस नेत्यांचे सरकारविरोधी निदर्शने

नंदूरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यात आज (दि.२) गांधी जयंती निमित्त काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विरुद्ध केलेले कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी करत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की घटनेबद्दल निषेध व्यक्त केला.
शहरातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, नवापुर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here