जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आत्मक्लेश पायी पेन्शन दिंडी

atmakelsh-dindi

वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – नवीन परिभाषित अंशदान सेवानिवृत्त वेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करता आज गांधी जयंतीचे औचित्य साधून अजय भोयर यांचे नेतृत्वात म रा शिक्षक परिषद तक्रार निवारण समिती व डीसीपीएस/ एनपीएस पेन्शन बचाव कृती समितीच्या वतीने वर्धा ते सेवाग्राम आश्रम आत्मक्लेश पायी पेन्शन दिंडी काढण्यात आली
1 नोव्हेंबर 2005 पासून नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. या आधारावरच राज्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्तं अंशत अनुदानित खाजगी शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन नाकारण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने नियम क्रमांक 2 पोटनियम एक व खंड (ब )व नियम क्रमांक 19 नियम क्रमांक 20 मधील पोट कलम दोन मध्ये 10 जुलै 2020 रोजी प्रस्तावित सुधारणा करून नियमबाह्यपणे अधिसूचना प्रकाशित केली व व राज्यातील समस्त शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार देय असलेली जुनी पेन्शन योजना संपुष्टात आणली याचा निषेध करण्याकरीता व राज्यातील सर्व व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आज ही आत्मक्लेश पायी दिंडी आयोजित करण्यात आली. दिंडीचा समारोप सेवाग्राम आश्रमात आत्मक्लेश व प्रार्थना करून तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देऊन करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे कुंडलिक राठोड, मुकेश इंगोले, संजय बारी ,सुनील गायकवाड ,राज धात्रक ,धिरज समर्थ अनिल टोपले, मनीष मारोटकर ,अमोल वाशीमकर ,पराग वाघ, विलास बरडे, परमेश्वर केंद्रे ,गजानन साबळे ,आतिष निंबाळकर ,दत्ता राऊळकर ,अंशू कोल्हे , संध्या देशमुख ,सौ सातपुते ,सौ तुमराम, राधा दुबे ,अजय कोल्हे, भोजराज जाधव, वर्षा राजगुरे प्रशांत चौधरी, विलास बरडे,प्रशांत दुधाने ,अभिजीत जांभूळकर, प्रकाश झाडे ,किशोर चौधरी ,अमित प्रसाद, रहीम शहा ,परमेश्वर केंद्रे ,अनंता पोरटे मेटकर, मिलिंद महल्ले, रुपेश चिडे मनोज वानी, पियुष कलोडे ,संदीप सांभारे,महेंद्र सातपुते, आशिष राऊत दिलीप मोहोड,विनायक सांभारे, सुनील ढाले ,मोहम्मद आरिफ, वाणे, माखनवार ,बडे,घागरे ,फुले ,सौरभ वाघ ,गाडगे ,झाडे ,धुमने, अकलूज वनशिंगे ,ननोरे,भोगे ,मंगेशे अकर्तॅ, डहाके, फुले,घाडगे, लोडे,सोनकुसरे,वनसिंगे,उमेश खंडार राहुल वानखेडे, खंडारे, जेउघाले, डगवार, भगत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here