राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि स्व. इंदिरा गांधी स्मृतिदिन उत्साहात साजरी

राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात राष्ट्रीय ऐक्याचे महामेरू, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५१ वी जयंती आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जळगाव जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन सर म्हणाले की, “भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे, देशातील विविध संस्थानांना एकत्र आणून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान देणारे भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे कणखर नेतृत्व, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील.” कार्यक्रमाचे आभार महानगर कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले.
याप्रसंगी राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात रमेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस), किरणभाऊ राजपूत (राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जिल्हा उपाध्यक्ष), गणेशभाऊ पाटील (महानगर उपाध्यक्ष), सुहास चौधरी (महानगर सरचिटणीस), फराह शेख, योगेश लाडवंजारी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here