यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी व कामगार बचाओ दिवस

yawal-congress

यावल (सुरेश पाटील) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने आज यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व कामगार बचाओ दिवस तसेच काळे कायदे रद्द करणेसाठी यावल रावेरचे लोकप्रिय आमदार मा. शिरीषदादा चौधरी जिप गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकीसंघ यावल येथून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
उत्तरप्रदेश येथे वाल्मिकी समाजाच्या तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्यामुळे यावल येथील वाल्मिकी समाजाच्या मंदिराजवळ मौनबत्या पेटवून तिथं मनीषाताईला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि परत तेथून मोर्चा तहसील कार्यलाय यावल येथे आल्यावर तिथं शेतकरी विरोधी कायदे कामगार विरोधी काळे कायदे तसेच देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि असभ्य वागणूक आणि मोदी योगी यांच्या राज्यात झालेल्या बलात्कार सामान्य जनतेची पिळवणूक याचा निषेध करण्यात आला. yawal-congress1यावेळी जिल्हा काँगेसचे उपाध्यक्ष जेष्ठनेते हाजी शब्बीरसेठ, मा. सभापती लीलाधरसेठ चौधरी,भगतसिंग बापू पाटील, काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, शहराध्यक्ष कदिरखान, अमोल भिरुड,समाधान पाटील,अनिल जंजाले, नितीनदादा चौधरी, अ.जा. जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे, केतनभाऊ किरंगे, फैजपूर शहराध्यक्ष रियाजभाई,नगरसेवक कलिमभाई, समीर मेमन खलील सेठ, हाजी गफ्फार शाह, रामराव मोरे, विवेक सोनार, संदीपभैय्या सोनवणे, अभय महाजन, विनोद पाटील, राहुल तायडे, तौफिक भाई, सद्दाम शाह,विक्की पाटील, गजु पाटील,जावेद जनाब, आदी कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस सेवा फौंडेशन सर्व फ्रंटलचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here