आज आढळले २९८ कोरोनाबाधित तर ८०५ कोरोनाबाधितांनी केली कोरोनावर मात
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.3) सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतर २९८ कोरोनाबाधित आढळून आले तर याच संख्येच्या जवळपास तीनपट ८०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित मुक्ताईनगर तालुक्यात १०४ तर जळगाव शहरासह भुसावळ तालुक्यात आज अनुक्रमे ७६ व २२ असा संसर्ग आढळून आला.
आज आढळलेल्या २९८ कोरोनाबाधितांमध्ये मुक्ताईनगर-१०४, जळगाव शहर-७६, भुसावळ-२२, जळगाव ग्रामीण-११, अमळनेर-६, चोपडा-२५, पाचोरा-७, भडगाव-२, धरणगाव-७, यावल-८, एरंडोल-१, जामनेर-४, रावेर-७, पारोळा-३, चाळीसगाव-७, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यांमधील ३ असा समावेश आहे.
दरम्यान, आज ८०५ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली असून, आत्तापर्यंत ४३ हजार १४८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज सात कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ हजार १९८ झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४ हजार ७५८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







