अनिल घाटगे यांची राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाच्या शहराध्यक्षपदी निवड

satej-patil

पालक मंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते सत्कार

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल घाटगे यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी पुणे पदवीधर मतदार संघाच्या राष्ट्रवादी कोल्हापूर शहर जिल्हा पदवीधर संघाच्या शहराध्यक्षपदी अनिल घाटगे यांची निवड केली.

निवडीचे पत्र माननीय माजी महापौर आर के पोवारशहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांनी काल महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रवादी कार्यालयांमध्ये अनिल घाटगे यांची निवड अधिकृतरित्या जाहीर केले

 

जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अनिल घाटगे यांचा सत्कार अजिंक्यतारा या ठिकाणी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आर के पोवार बाबा पार्टे रियाज कागदी उपस्थित होते यावेळी संयुक्त राजारामपुरी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

 

anil-ghatgeयावेळी बोलताना ग्रहमंत्री नामदार सतेज पाटील म्हणाले श्री अनिल घाटगे त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय चांगली आहे त्यांचे सर्वच पक्षात अतिशय चांगले संबंध असून येणाऱ्या पदवीधर मतदार संघामधून वेगळा इतिहास घडवतील याची मला खात्री आहे माझ्या मनापासून शुभेच्छा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आर के पोवार बोलताना म्हणाले प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयाने दिलेली जबाबदारी अनिल घाटगे निश्चितपणे समर्थपणे पार पाडतील याचा मला विश्वास आहे माझा चांगला कार्यकर्ता आहे अशा भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here