कोल्हापूर (प्रतिनिधी रहिम पिंजारी) । लक्ष्मीपुरी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्री गोरक्षनाथ मित्र मंडळाच्या (पॅसेंजर वाहतूक संघटना) गणपती बाप्पाचे काल भक्तीपूर्ण वातावरणात आगमन झाले.हे मंडळ गेल्या पाच वर्षांपासून शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचे मोठे काम करत आहे.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोवार यांनी सर्व रिक्षा चालक आणि मालकांना एकत्र आणून या मंडळाची स्थापना केली. लक्ष्मीपुरी येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिराशेजारी हे मंडळ कार्यरत आहे.या मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व जाती-धर्माचे लोक, तसेच रिक्षा चालक-मालक एकत्र येऊन अत्यंत भक्तीभावाने सलग दहा दिवस गणरायाची पूजा-आरती व सेवा करतात.
काल झालेल्या या आगमन सोहळ्याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोवार यांच्यासह रियाज जैनापुरे, ओमकार हिरवे, बबलू मोमीन, अझर मुल्ला, कादिर खाटीक, रशीद सय्यद, फिरोज शेख, रियाज मौला, दिलावर काझी, अमीर नदाफ, उत्तम पोवार, अनिरुद्ध पोवार (गोल्या) आणि *अजय साळुंखे यांसह इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







